
चॉकलेटच्या अनेक प्रकारांमध्ये फरक असतो. सर्वात पौष्टिक मानलं जाणारं म्हणजे डार्क चॉकलेट, ज्यामध्ये कोकोचं प्रमाण अधिक असतं आणि अँटीऑक्सिडंट्सही भरपूर असतात. मात्र त्याची चव कडसर असते, त्यामुळे सगळ्यांना आवडत नाही. दुसरीकडे, मिल्क चॉकलेट ही सर्वाधिक लोकप्रिय असते. पण त्यात साखर आणि दूध हे दोन्ही भरपूर प्रमाणात असतं. व्हाइट चॉकलेटमध्ये तर कोको सॉलिड्स नसतातच, त्यामुळे ती केवळ गोडसर फॅटी मिठाईच ठरते. याशिवाय बाजारात मिळणारी फ्लेवर्ड किंवा प्रोसेस्ड चॉकलेट ही तर कृत्रिम रंग, फ्लेवर आणि प्रिझर्व्हेटिव्ह्सचा भडिमार असते.
जगभरात 7 जुलै रोजी ‘वर्ल्ड चॉकलेट डे’ साजरा केला जातो. चॉकलेट हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात गोड स्थान मिळवून बसलेलं आहे. कोणी स्ट्रेसमध्ये खातं, कोणी गिफ्ट म्हणून देतं, तर कोणी रोजच्याच सवयीचा भाग म्हणून. चॉकलेटची चव मुळातच अशी आहे की तिला नकार देता येत नाही. पण या दिवसाच्या निमित्तानं थोडं थांबून एक विचार करायला हवा, आपण खात असलेली चॉकलेट्स आपल्या आरोग्याला किती योग्य आहे?
यातच खरी चिंता आहे. या चॉकलेट्समध्ये लपलेले आरोग्याला हानीकारक घटक. सर्वसामान्य चॉकलेटमध्ये साखर प्रचंड प्रमाणात असते. याशिवाय, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरपसारख्या घटकांचा वापर होतो, जो शरीरात चरबी वाढवतो, आणि इन्सुलिनची कार्यक्षमता बिघडवतो. हायड्रोजनेटेड ऑइल्स किंवा पाम ऑइलमुळे ट्रान्स फॅट्स निर्माण होतात, जे हृदयविकाराला कारणीभूत ठरतात. शिवाय कृत्रिम फ्लेवर्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्स मुळे त्वचा विकार, अॅलर्जी, अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, जेव्हा तुम्ही गोड खात असता, तेव्हा चवसोबत तुम्ही काय शरीरात टाकत आहात, याचाही विचार करायला हवा. चव आवडली म्हणून जर रोज हानिकारक गोष्टी खाल्ल्या जात असतील, तर त्याचा दीर्घकालीन परिणाम टाळता येणार नाही. म्हणूनच, आता वेळ आहे चव आणि आरोग्य यामधला समतोल साधणाऱ्या पर्यायाची.
यासाठीच, PIP Agro ने सादर केलेली MilletBar एक आरोग्यदायी, नैसर्गिक आणि सुज्ञ निवड आहे. ही MilletBar गोड आहे, पण साखरेवर अवलंबून नाही. यात वापरलेला गोडवा नैसर्गिक आहे – जसे की गूळ, खजूर किंवा मध. याशिवाय, यामध्ये कोणताही कृत्रिम फ्लेवर, रंग किंवा रासायनिक प्रिझर्व्हेटिव्ह्स नाहीत. मुख्य म्हणजे, ही बार बाजरी, नाचणी, तांदूळ, शेंगदाणे आणि तुपासारख्या पारंपरिक, घरगुती आणि पोषक घटकांपासून बनवलेली आहे. त्यामुळे ही चॉकलेटची जागा घेते, पण शरीरासाठी हानिकारक न होता उपयुक्त ठरते.
MilletBar म्हणजे केवळ एक चॉकलेटचा पर्याय नाही, तर ही आहे स्वस्थ सवयीची सुरुवात. ही एक अशी स्नॅक आहे जी शरीरात उर्जा देते, पचनाला मदत करते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सुरक्षित गोडवा देते. आणि विशेष म्हणजे, हे सगळं करत असतानाही ही MilletBar चविष्ट आणि समाधानकारक असते, म्हणजे “गिल्ट-फ्री गोडवा” मिळतो.
आज वर्ल्ड चॉकलेट डेला, आपण ठरवूया चव ही हवीच, पण ती जबाबदारीची असावी. अशी चव जी शरीराच्या पोषणाला हातभार लावेल, आणि त्याच वेळी मनाला आनंदही देईल. PIP Agro ची MilletBar हे याच विचारांचं प्रतीक आहे, जिथे चव, आरोग्य आणि परंपरेची गोड सांगड घातली आहे.
MilletBar विषयी अधिक जाणून घ्या – www.organicheaven.com